Tuesday, 10 July 2012

!!! लालबागचाराजा प्रबोधिनी !!!

Last  Date  :  11  July 2012  ( Time: 5:00 PM--8:00PM)

Document :  1. Result  Copy
                      2. Address  Proof ( Ration Card)
                      3. Photo (2)


Eligibility  : Above  S.S.C  ( All  Other)

( Form are available at Trust . Carry all document , fill up form at Trust office and  submmit at Trsut)साने गुरुजी अभ्यासिका:
कुटुंबातील माणसांची गर्दी, घराची लहानशी जागा या गोष्टी लक्षात घेऊन मुंबईतील मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी मंडळाने मोफत अभ्यासिका चालू केली आहे. ही अभ्यासिका संपूर्णत: वातानुकूलित असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. ही अभ्यासिका सकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत खुली असते.

स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय:
आपण जाणतोच की वाचनामुळे मनुष्याची विचारशक्ती परिपूर्ण होते. तसेच सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षणाला पर्याय नाही. पण उच्च शिक्षणासाठी लागणाऱया पुस्तकांच्या किंमतीही उच्च असतात. पुस्तकांच्या वाढणाऱया किंमतींमुळे कित्येक चोखंदळ वाचक वा शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी पुस्तके विकत घेऊ शकत नाही.
अनेक विद्यार्थी व वाचकांची ही अडचण लक्षात घेऊन मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर  ग्रंथालय सुरू करण्यात आले. यात कथा-कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, नाट्य-कविता, ऐतिहासिक, राजकीय, आरोग्य, विज्ञान आणि बालवाङमय अंतर्गत अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार साहित्यकृती तसेच इंग्रजी साहित्य विश्वातील दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. यासोबत ग्रंथालयात विविध क्षेत्रातील इ.10वी पासून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, तसेच UPSC/MPSC, MHT-CET, GRE, JEE, AIEEE, CAT, GATE, NDA, CDA, STAFF SELECTION, BARC, बँकिंग, विमा क्षेत्र, भारतीय रेल्वे, भारतीय विमान वाहतूक, इ. स्पर्धा व प्रवेश परीक्षा त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, कायदा, औषधशास्त्र, वैद्यकीय, संगणक, व्यवस्थापन, शिक्षण शास्त्र विषयक शाखांतील मान्यवर लेखकांची व विविध नामवंत प्रकाशन संस्थांची संदर्भ पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय संपूर्णत संगणकीकृत, अद्ययावत व सुसज्ज असे आहे.

संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी:
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षादरम्यान अभ्यासासाठी अनेक पुस्तके नित्यनियमाने लागतात. अशी पुस्तके विकत घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. परंतू आर्थिकदृष्टया गरीब विद्यार्थ्यांना ते परवडत नाही.  म्हणून या प्रबोधिनामध्ये राज्यभरातील गरीबवगरजूविद्यार्थ्यांसाठी `संत ज्ञानेश्वर पुस्तक पेढी' सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत. या पुस्तक पेढीतील पुस्तके सूंपर्ण वर्षासाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य पुरविली जातात.


स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती:
अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे शिक्षणाबरोबरच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे काहींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मंडळातर्फे अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांकरिता स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत.संपर्क :

            लालबागचाराजा प्रबोधिनी, 
            पेरू चाळ, 
            डॉ.आंबेडकर मार्ग, 
            लालबाग, 
            मुंबई -400 012. 
            
            Telephone:  022-2471 59 59
                               022-2471 5958
                               022-2471 5957No comments:

Post a Comment